Signal हे आपल्या डेटा आणि फायद्यासाठी नव्हे; तर आपल्यासाठी तयार केलेले आहे. आम्ही आपल्या सपोर्टसह- मुक्त अभिव्यक्तीचे संरक्षण करणे आणि मुक्त स्त्रोत गोपनीयता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित वैश्विक संप्रेषनाला सक्षम करणे या आमच्या ध्येयाचा पाठपुरावा करतो. खाजगी संदेशन. कोणत्याही जाहिराती नाहीत, कोणतेही ट्रॅकर्स नाहीत, कोणतीही पाळत नाही.

आपली देणगी Signal वर अवलंबून असलेल्या जगभरातील करोडो लोकांना Signal उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हर आणि बॅण्डविड्थ यांच्या समावेशासह Signal च्या विकासासाठी आणि देखभालीसाठी प्रदान करण्यास मदत करेल.

आपण जर आपल्या देणगीसोबत ईमेल प्रदान केल्यास, आपणाला आपल्या कर नोंदीसाठी ईमेल पुष्टीकरण प्राप्त होईल. Signal टेक्नोलॉजी फाऊंडेशन ही एक US अंतर्गत रेव्हेन्यू कोडच्या कलम 501c3 खाली स्वतंत्र आणि कर-माफी असलेली ना नफा धर्मादाय संस्था आहे. आमचा फेडरल कर ID क्रमांक 82-4506840 आहे.

टीप: आपण Signal ॲपमधून देणगी दिल्यास आपणाला आपल्या Signal अकाऊंटमध्ये फक्त एक बॅज प्राप्त होईल.


देणगी देण्याचे इतर मार्ग

Signal डोनर ॲडव्हाईज्ड फंड्स (DAFs) कडून क्रिप्टोकरन्सी, शेअर आणि भेट यांची देणगी स्विकारते . या देणग्या गिव्हिंग ब्लॉकमधून प्रक्रिया केल्या जातात.

आपणाला जर आपल्या देणगीच्या वाजवी बाजार मूल्यासाठी US मध्ये कर वजावट प्राप्त करावयाची असल्यास, आपण कर पावती प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्ता प्रदान करू शकता. गिव्हिंग ब्लॉक क्रिप्टोकरन्सीच्या आणि DAFs मधून केलेल्या निनावी देणग्यांना ही सपोर्ट देतात.

टीप: आपण Signal ॲपमधून देणगी दिल्यास आपणाला आपल्या Signal अकाऊंटमध्ये फक्त एक बॅज प्राप्त होईल.