मोकळेपणाने बोला

एका वेगळ्या संदेशन अनुभवाला "नमस्कार" म्हणा. आपल्याला अपेक्षित असलेल्या सर्व वैशिष्ट्यांसोबत एकत्रित, गोपनीयतेवर अनपेक्षित लक्ष्य.


Signal मिळवा

Signal का वापरावे?

Signal एक सरळ, शक्तिशाली, आणि सुरक्षित संदेशक का आहे ते बघण्यासाठी खाली बघा

असुरक्षिततेशिवाय सामायिक करा

अत्याधुनिक एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (ओपन सोर्स Signal प्रोटोकॉल द्वारा पॉवर केलेले) आपली संभाषणे सुरक्षित ठेवते. आम्ही आपले संदेश वाचू शकत नाही किंवा आपले कॉल ऐकू शकत नाही, आणि इतर कुणी देखील करू शकत नाही. गोपनीयता एक पर्यायी मोड नाही — Signal असेच कार्य करते. प्रत्येक संदेश, प्रत्येक कॉल, प्रत्येक वेळी.

काहीही बोला

मजकूर, व्हॉईस संदेश, फोटोज, व्हिडिओ, GIF आणि फाईल विनामुल्य सामायिक करा. आपण SMS आणि MMS फी टाळू शकण्यासाठी Signal आपल्या फोनचे डेटा कनेक्शन वापरतो.

मोकळेपणाने बोला

कुठल्याही लांब-अंतर चार्ज विना, शहराच्या पलीकडे, किंवा समुद्रा पलीकडे जी लोक राहतात त्यांना साफ-स्पष्ट व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करा.

गोपनीयतेला सोबत ठेवा

एन्क्रिप्टेड स्टिकर्स सोबत अभिव्यक्तीचा एक नवीन स्तर जोडा. आपण आपले स्वतःचे स्टिकर पॅक्स देखील बनवू शकता आणि सामायिक करू शकता.

गटांसोबत एकत्र या

गट चॅटमुळे आपले कुटुंब, मित्र आणि सहकार्‍यांशी कनेक्ट राहणे सोपे होते.

कुठल्याही जाहिराती नाही. कुठलेही ट्रॅकर नाहीत. कुठलीही चेष्टा नाही.

कुठल्याही जाहिराती नाहीत, कुठलेही संलग्न मार्केटर नाहीत, आणि कुठलीही भितीदायक ट्रॅकिंग नाही. त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचे असलेल्या व्यक्तींसोबत हे क्षण सामायिक करण्याकडे लक्ष द्या.

प्रत्येकासाठी विनामूल्य

Signal एक स्वतंत्र विनानफा आहे. आम्ही कुठल्याही मोठ्या तांत्रिक कंपनी यांच्यासोबत बांधले गेलेलो नाही, आणि आम्हाला कोणीही अधिग्रहित करू शकत नाही. विकसन हे आपल्या सारख्या लोकांकडून येणाऱ्या अनुदाने आणि देणग्यांद्वारे समर्थित आहे.

Signal ला देणगी द्या